Latest Marathi News

BREAKING NEWS

या सरकारन ‘मुखवटे’ चढवून स्वतःला देशभक्त भासवायचे आणि…..!

0

संपूर्ण देशभरात आज उत्साहाने स्वतंत्र दिवस साजरा केला जात आहे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे राजकीय वातावरण सुद्धा तापलेले दिसून येते. अशात उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे. राज्याच्या राजकारणात अद्यापही संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती कायम आहे. या सर्वांवरुन सामनातून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. तसेच सामान्य जनतेला पारतंत्र्य उलथवून लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

एकीकडे ब्रिटिशकायद्यांचे जोखड फेकून नवे ‘सार्वभौम’कायदे आणल्याचे ढोल पिटायचे आणि दुसरीकडे स्वतंत्र हिंदुस्थानच्या कायद्यांचा, नागरीस्वातंत्र्याचा संकोच करायचा. देशातील हे चित्र चिंताजनक आहे. हिंदुस्थान हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहेच , परंतु हिंदुस्थानी घटनेने आणि लोकशाहीने जनतेला दिलेले अधिकार, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य यांवर घाला घालून देशात नवी गुलामगिरी जन्माला घालण्याचे उद्योग मागील 9 वर्षांपासून सुरू आहेत . स्वातंत्र्यातील हे ‘पारतंत्र्य’ उलथवून टाकण्याची शपथ जनतेनेच आजच्या स्वातंत्र्य दिनाला साक्षी ठेवून घ्यायला हवी!, अशा शब्दांत सामनातून जनतेला आवाहन करण्यात आलं आहे.

शासना मार्फत घरोघरी राबवण्यात आलेल्या उपक्रमांवर देखील सामनातून भाष्य केलं गेलं आहे. “‘हर घर तिरंगा’ आणि ‘माझी माती-माझा देश’ हे उपक्रम घोषित झाले. ‘मिट्टी को नमन, वीरों को वंदन’ या घोषवाक्यासह ‘माझी माती-माझा देश’ हा उपक्रम 9 ऑगस्टपासून देशभरात राबविला गेला. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘पंचप्रण शपथ’ घ्यायची आणि मातीचा दिवा हातात घेऊन काढलेला ‘सेल्फी’ संबंधित संकेतस्थळावर अपलोड करायचा असे त्याचे स्वरूप होते. या अभियानांमागे देशभक्तीची भावना जागृत व्हावी हा उद्देश आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. ते खरे असेलही आणि हे उपक्रम चांगलेच आहेत, परंतु त्या सोबतच राज्यकर्त्यांचा कारभारही तेवढाच खरा आणि शुद्ध आहे का?”, असा सवाल केंद्र सरकारला विचारण्यात आसा आहे.

हे सरकार सत्तेत आले तेव्हापासूनच, म्हणजे 2014 पासूनच या सरकारचा चेहरा वेगळा आणि मुखवटा वेगळा आहे. वेगवेगळे ‘मुखवटे’ चढवून स्वतःला देशभक्त भासवायचे आणि त्या मुखवट्याआड लपून आपली हुकूमशाही राबवायची. एकीकडे स्वातंत्र्याचा घोष करायचा आणि दुसरीकडे त्याच स्वातंत्र्याची गळचेपी करायची. स्वातंत्र्य, लोकशाही फक्त तोंडी लावायला, बाकी कारभार दडपशाही आणि निरंकुश दबाव तंत्राचा. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा जेवढा अनिर्बंध वापर देशात मागील नऊ वर्षांत झाला, तेवढा कधीही झालेला नाही.

ध्वजारोहणानंतर पीएम मोदींनी लाल किल्ल्यावरून बोलताना मणिपूरचा उल्लेख

Leave A Reply

Your email address will not be published.