Latest Marathi News

BREAKING NEWS

मुळेगाव तांड्यात कारवाई; ९ आरोपीवर गुन्हे दाखल

0

सोलापूर|

ऑपरेशन परिवर्तन अभियान अंतर्गत सोलापूर तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर यांची संयुक्त मोहिम मुळेगांव तांडा येथे सर्च मोहित राबवत धडाकेबाज करत ९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. १० लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन परिवर्तन अभियान अंतर्गत हातभट्टया, दारुनिर्मिती व विक्री करणाऱ्या अवैध धंदयावर वेळोवेळी रेड करून समूळ उच्चाटन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुळेगांव तांडा येथे ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचेसह सोलापूर तालुका पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुळेगांव तांड्यातील एकूण २८ घरांमध्ये जावून शोध घेण्यात आला. एकूण ९ ठिकाणी छापे मारून एकूण एकूण ३० हजार ८०० लिटर गुळमिश्रीत रसायन बॅरेल व सिमेंटच्या हौदामधील ८४० हातभटटी दारू रबरी टयुब व कॅन मधील २४० लिटर गुळपाक असा मिळून एकूण १० लाख ५१ हजार रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करून एकूण ९ आरोपींवर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.