बार्शी|
अक्षर मानव चित्रपट विभाग व यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी आयोजित ” अक्षर मानव चित्रपट संमेलनाचे ” उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील बार्शी तालुक्यात पहिल्यांदाच स्थानिक कलावंत, मराठी चित्रपटसृष्टी व मराठी धारावाहिक मधील कलाकारांचे हे तीन दिवसीय चित्रपट संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सदरच्या तीन दिवसीय चित्रपट संमेलनामध्ये अनेक विषयांवर चर्चासत्र व मार्गदर्शन होणार असून यामध्ये नामवंत मराठी कलाकार, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार आदी सहभाग घेणार आहेत.
या चित्रपट संमेलनामध्ये
१) चित्रपट संगीतात लोकसंगीताचे योगदान, २) आम्हांला संधी हवी आहे, ३) चित्रपट सृष्टीतील संधी व आव्हाने, ४) चित्रपट निर्मिती नफा आणि तोटा, ५) चित्रपट तांत्रिक व अतांत्रिक,
६) जाती-धर्मात सिनेमा अडकतो का ? ७) रिल्स आणि मीम्स फायदे-तोटे, ८) लघुचित्रपट निर्मिती सहज आणि सोपी झाली का ?, ९) सिनेमातील स्त्री चित्रण, १०) चित्रपट, कला, व्यवसाय व भविष्य अशा विषयांवर चर्चासत्र व मार्गदर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे संमेलनात सहभागी कलाकारांचे कलागुण सादरीकरण होणार आहे.
या चित्रपट संमेलन उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष व प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, स्वागताध्यक्ष व यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष अरुण दादा बारबोले व चित्रपट क्षेत्राशी निगडित नामवंत मंडळी, कलाकार उपस्थित होते.