Latest Marathi News

BREAKING NEWS

“कोण रोहित पवार? आम्ही बोलावं एवढी त्याची लायकी नाही”

0

राज्यात शिंदे फडणीवस सरकार स्थापन झाल्यापासून राज्य सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार सुद्धा सावरकरांच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री शिंदे सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली होती तसेच आता काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला होता या टीकेला आता भाजपा मंत्र्याने सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

ठाण्यात काल गौरव यात्रा पार पडली. यावेळी या गौरव यात्रेत भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. “रोहित पवार कोण? त्याची काय औकात? बोलण्याच्या औकातीचा तो माणूस नाही, असं रवींद्र चव्हाण म्हणाले. “राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ही गौरव यात्रा आहे.

कोण रोहित पवार? काय त्याची औकात? त्याच्याबद्दल काय बोलायचं? बोलण्याच्या औकातीचा तो माणूस नाही ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर कळत नाही, त्याना बोलण्याचा काही अधिकार नाही, असं रवींद्र चव्हाण म्हणाले. यापूर्वी सुद्धा भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह रोहित पवारांवर निशाणा साधला होता आता या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.