एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेना नेमकी कोणाची यावरून वाद खूप पेटले होते. काल याप्रकरणावर सर्वोच्य कोर्टात सुनावणी पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने न्यायालयात शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तसेच पक्षावरील वर्चस्व ठरवण्यापासून निवडणूक आयोगाला रोखावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र काल सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कडून निकाल लागला आणि ठाकरेंनी दाखल केलेली याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकार संदर्भात एक वक्तव्य केलं आहे.
शिवसेनेचे बंडखोर 16 आमदार अपात्र ठरले, तर पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊ शकते, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, संविधानातील तरतुदीनुसारच ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात युक्तीवाद केलेला आहे.
तसेच, पीएफआय संस्थेवर करण्यात आलेल्या कारवाईवर बोलताना, केंद्रात भारत आणि पाकिस्तान असा वाद निर्माण करून राजकारण करणारी लोकं बसलेली आहेत. देशात दहशतवाद्यांना मदत करणारी अनेक कार्यालयंही उघडली गेली आहेत. ही कार्यालयं केंद्राने अगोदर बंद करायला हवीत. मात्र सरकार यांच्या पाठीशी आहे असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर लगावला होता.