Latest Marathi News

BREAKING NEWS

आता महानुभाव पंथही संतापले,’सुषमाताई अंधारे ताईंच्या पक्षाला कधीच मतदान करणार नाही,

0

शिवसेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर देखील अवमानकारक टीका केली होती. मात्र आता त्यानी हिंदुत्ववादी शिवसेनेत प्रवेश केलेला असल्याने तुम्ही प्रभू रामाची माफी मागणार का? असा प्रश्न बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांकडून विचारला जात आहे. आता सर्व स्थरातून होत असलेल्या टीकेमुळे सुषमा अंधारे यांचा अडचणी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे

अशातच सुषमा अंधारे त्यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडल्या आहेत. दरम्यान, सुषमा अंधारेंच्या भगवान श्रीकृष्णा विषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आता महानुभाव संप्रदायात संतापाची लाट उसळली आहे. औरंगाबादमधील महानुभाव आश्रमात भगवान श्रीकृष्णासमोर ही शपथ घेण्यात आली. आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात हा संकल्प पोहोचवणार असल्याचं महानुभाव पंथाच्या वतीने यावेळी सांगण्यात आलं.

महानुभाव पंथीय साधक यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, ‘आम्ही सर्व महानुभाव पंथाचे साधक आज शपथ घेतो की,’श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी आमच्या दैवताबद्दल जे अपशपथ वापरले आहे त्यांचा आम्ही निषेध करतो, ज्या पक्षामध्ये सुषमाताई अंधारे राहतील त्या पक्षाला आम्ही महानुभाव पंथीय साधक कधीच मतदान करणार नाही. अशी शपथ आज आम्ही भगवान कृष्णाला साक्षी ठेऊन घेत आहो..जय गोपाळ कृष्ण महाराज की जय…!” असं म्हणत त्यांनी शपथ घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.