Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजप नेत्याच्या ‘ब्लँकेट वाटप’ कार्यक्रमात चेंगराचेंगरी, तिघांचा मृत्यू

0

मुंबई |

भाजप नेते आणि पश्चिम बंगाल मधील विरोधी पक्ष नेते शुभेंदू अधिकारी यांच्या ‘ब्लँकेट वाटप’ कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. पश्चिम वर्धमानमधील आसनसोल येथे बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

शुभेंदू अधिकारी यांनी ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या घटनेत अन्य पाच जण जखमी झाले आहेत. ब्लँकेट वाटप सुरु असताना उपस्थितांनी ब्लँकेट घेण्यासाठी मंचाच्या दिशेने धाव घेतली त्यावेळेस ही चेंगराचेंगरी झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम एका धार्मिक गटाने आयोजित केला होता. मात्र या रिपोर्ट्सनुसार, कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. मीडिया हा कार्यक्रम आसनसोलचे माजी महापौर आणि भाजप नेते जितेंद्र तिवारी यांनी आयोजित केला होता. शुभेंदू अधिकारी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले असता ही चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत तीन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने शुभेंदू अधिकारी
यांच्यावर निशाणा साधला आहे. टीएमसीने या दुर्घटनेसाठी शुभेंदू अधिकारी यांना जबाबदार धरले आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय ही बेकायदेशीर रॅली का आयोजित केली? भाजप गरिबांच्या जिवाशी खेळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.