भाजप आमदार राम सातपुते यांनी केलेल्या ट्विटवरून आता शिवसेनेनं संताप व्यक्त केला आहे. या विषयी बोलताना शविसेना खासदार अरविंद सेवनात यांनी थेट भाजपाला सवाल विचारला आहे. प्रभू राम तर भाजपच्या आस्थेचा विषय… रामाच्या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमकतेने बोलतं. शिवसेनाही हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करते. पण सध्या ‘रामा’च्या मुद्द्यावरून भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेनं ‘रामा’च्या मुद्द्यावरून घेरलं आहे.
भारतीय जनता पक्षाचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी एक ट्विट केलं होतं. त्याच्या आधारे खासदार अरविंद सावंतांनी भाजपवर निशाणा साधलाय. हे कसले राम हे तर हराम!, असं म्हणत त्यांनी जहरी टीका केली आहे. शिवाय भाजपचेच आमदार जर अशी असभ्य भाषा वापरणार असतील तर त्यांनी रामराज्याची भाषा करू नये, असंही ते म्हणालेत. राम सातपुतेंच्या भाषेवर सावंत यांनी आक्षेप घेतला आहे.
भाजपचे युवा आमदार राम सातपुते यांनी एक ट्विट केलं. आधी फाटलेल्या चड्डीला ठिगळं लावा, उगाच आभाळ हेपलायचे धंदे बंद करा, असं ट्विट राम यांनी केलं होतं. त्यांनी हे ट्विट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं होतं. त्यावर अरविंद सावंत यांनी आक्षेप घेतलाय.’कोण हे राम ! सातपुते.. भाजपचे सदस्य का? काय त्यांची भाषा, हेच का भाजपचे हिंदुत्वाचे संस्कार! आदरणीयचा असा घोर अपमान करणारे राज्यकर्ते भाजपचे अलंकारात. हे कसले राम, हे तर हराम. त्यांच्यावर शोध करून शोधणे आहेत देवेंद्र फडणवीसजी रामराज्याची भाषा करू नका’, असं ट्विट अरविंद सावंत यांनी केलं आहे.