सोलापूर-
सोलापूर शहर पोलीस दलातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी नोटा घेऊन जाणाऱ्या वाहनास ताब्यात घेतले आहे.ही कारवाई सोलापूर तुळजापूर मार्गावर असलेल्या तुळजापूर नाक्या जवळ ब्रिज खाली गुरुवारी 29 सप्टेंबर रोजी झाली.पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत व त्यांच्या टीमने वाहनाची कसून तपासणी करत ,29 लाख 50 हजार रुपयांच्या नोटा व चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी वाहनातील दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणून चौकशी सुरू केली आहे.याबाबत आयकर विभागाला अधिक माहिती देऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पीएसआय ताकभाते यांनी दिली.
*नोटां घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात-
जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आपल्या ताफ्यासह पेट्रोलिंग करत होते.29 सप्टेंबर गुरुवारी सकाळी सोलापूर तुळजापूर मार्गावरील तुळजापूर नाक्या जवळील बपुलाखाली वाहनांची तपासणी करत थांबले होते.पोलिसांना पाहून एमएच 13 डीव्ही 1786 हे वाहन संशयीत रित्या हळू पुढे सरकत होते.पोलिसांना संशय येताच त्यांनी सदर वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला.वाहन थांबताच त्याची कसून तपासणी केली,वाहनचालक सय्यद मुजावर, क्षीरसागर असे दोघे जण वाहनात बसले होते.वाहनात नोटांनी भरलेली बॅग पोलिसांना दिसली.त्या नोटाबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांनी वाहन पोलीस ठाणे येथे आणून चौकशी सुरू केली,रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.