Latest Marathi News

BREAKING NEWS

४० भाऊ कॉपी करून पास झाले, त्यांची अवस्था….सुषमा अंधारेंची पुन्हा शिंदे गटावर तोफ धडाडली

0

मुख्यमंत्री एकनाथ भाऊ आहेत हा गैरसमज ठेवू नका. कारण, सर्व कामे देवेंद्र फडणवीस यांच्याच इशाऱ्यानं होतात असं वक्तव्य शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं. महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याणमध्ये आयोजित केलेल्या सभेत अंधारे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी एका गाडीत एकनाथ शिंदे बाजूला बसले होते आणि स्टेयरिंग देवेंद्र फडणवीस यांच्या हातात होतं. हेच खरं चित्र असल्याचा खोचक टोला अंधारेंनी लगावला.

माझे 40 भाऊ कॉपी करून पास झाले आहेत. त्यांना कळत नाही सगळी मलिद्याची खाती भाजपकडे गेली आहेत. माझ्या भावांकडे सगळी खाती कपडे फाडण्याची आहेत असा टोलाही अंधारेंनी शिंदे गटातील आमदारांना लगावला. महाप्रबोधन यात्रेला राज्यात प्रतिसाद चांगला मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आम्हाला खात्री आहे की येत्या निवडणुकीत उद्धवसाहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाचे चित्र पाहायला मिळेल, असा विश्वासही अंधारे यांनी बोलून दाखवला.

तसेच यावेळी अंधारे यांनी सभेत किरीट सोमय्या यांचे काही व्हिडीओ देखील दाखवले. यामध्ये त्यांनी नारायण राणे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव, आनंद अडसूळ, अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केले होते. किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले, त्यांच्याच चौकशा आता का थांबल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आता अंधारे यांनी शिंदे गटावर केलेल्या आरोपांना कशाप्रकारे प्रतिउत्तर मिळते हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.