Latest Marathi News

BREAKING NEWS

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप शड्डू ठोकणार

0

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहेत. यासाठी पैलवानांनी तयारीही सुरू केली आहे परंतु आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे ठेवायच्या यावरून वाद सुरू झाला आहे. मागच्या 3 महिन्यांपूर्वी अध्यक्ष पदावरून वाद झाला होता आता पुन्हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे ठेवायच्या यावरून वाद सुरू झाला आहे. लांडगे गटाकडून या स्पर्धा नगरला जाहीर होताच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ मैदानात उतरले आहेत.

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेवरून तडस गट आणि लांडगे गट असा वाद आहे. यावरून लांडगे गटाकडून 25 डिसेंबरला कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. लांडगे गटाकडून नगरमध्ये या स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. यामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी नेतृत्व केले आहे. याच दरम्यान स्पर्धा पुण्यात व्हाव्यात यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये आता तडस गटाकडून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते राष्ट्रीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभुषण सिंह यांची भेट घेत त्यांच्याकडून ठिकाण व तारखा निश्चित करून घेणार आहेत.

दरम्यान याबाबत येत्या 13 डिसेंबरला प्रेस घेऊन पुण्यातील स्पर्धेची तारीख जाहीर करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितलं. याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. रेसलिंग फेडरेशन ॲाफ इंडियाने तीन जणांची ॲडॲाफ कमिटी कुस्तीगीर परिषदेवर नेमली होती ती अयोग्य असल्याची याचिका कुस्तीगीर परिषदेच्या लांडगे गटाने उच्च न्यायालयाकडे केली होती. उच्च न्यायालयाने लांडगे गटाचे हे म्हणणं मान्य केल आहे. दरम्यान रेसलिंग फेडरेशनने कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द केली आहे.

बाळासाहेब लांडगे गट आणि रामदास तडस यांचे गट आमचाच गट खरा असा दावा करू लागले आहेत. दोन्ही गटांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची घोषणा केली. यावरून नवा वाद सुरू झाला आहे. लांडगे गटाने अहमदनगरला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने तर तडस गटाने मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुण्यात महाराष्ट्र केसरी घेणार असल्याच जाहीर केले. मात्र लांडगे गटाकडून तडस गटाला महाराष्ट्र केसरी हे टायटल वापरता येणार नाही असा दावा करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.