Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवारांची साथ सोडून देण्याची वेळ का आली, धनंजय मुंडे म्हणाले की

0

मुंबई : शिंदे फडणवीस सरकार स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. या बंडा नंतर शरद पवारांनी थेट गद्दारांच्या विरोधात मैदानात उतरण्याचे ठरविले होते तसेच छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात जाहीर सभा सुद्धा घेतली होती. अशातच आताअजित पवारांसह आमदारांनी केलेल्या बंडावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? ईडी, सीबीआयच्या नोटीसांमुळे भाजपाबरोबर गेलात का? या प्रश्नांवर धनंजय मुंडे म्हणाले, “शरद पवार हे आमचा आधार आणि दैवत आहेत. पण, भाजपाचा आधार घेणं किंवा बरोबर जाणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घेतलेली भूमिका आहे. ५ जुलै रोजी झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.” इचक विधान धनंजय मुंडे यांनी केलं

ईडी, इन्कम टॅक्सच्या नोटीसा आज नाहीतर, गेल्या अनेक वर्षापासून आल्या आहेत. मात्र, याच्या भीतीने आम्ही भाजपाबरोबर गेलो, हे लोकांमध्ये पसरवलं जातं. राष्ट्रवादीच्या उभारणीत स्वाभीमान हा विषय होता. हा पक्ष लोकशाही मानणार आहे. आमच्यासाठी दैवत आणि आधारस्तंभ शरद पवारच आहेत. लोकप्रतिनिधींची कामे आणि मतदारसंघाचा विकास होणे याला आमदार म्हणून आम्ही उत्तरदायीत्व आहे,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.