Latest Marathi News

BREAKING NEWS

1 मे पासून बनावट Calls आणि SMS पासून यूजर्सची होणार सुटका

0

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI ने नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार, TRAI एक फिल्टर सेट करत आहे, जे 1 मे 2023 पासून फोनमधील बनावट कॉल आणि एसएमएस थांबवेल. यानंतर यूजर्स अनोळखी कॉल्स आणि मेसेजपासून मुक्त होतील. TRAI ने दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या फोन कॉल आणि संदेश सेवांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पॅम फिल्टर स्थापित करण्याचे निर्देश जारी केले आहेत. हे फिल्टर फेक कॉल्स आणि मेसेजपासून यूजर्सचे संरक्षण करण्यात मदत करेल.

या नवीन नियमानुसार, फोन कॉल्स आणि मेसेजशी संबंधित सर्व टेलिकॉम कंपन्यांना 1 मे 2023 पूर्वी फिल्टर स्थापित करावे लागतील. या संदर्भात एअरटेलने अशा AI फिल्टरची सुविधा आधीच जाहीर केली आहे. तर Jio ने देखील या नवीन नियमानुसार आपल्या सेवांमध्ये AI फिल्टर्स बसवण्याची तयारी दर्शवली केली आहे. सध्या याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही, पण 1 मे 2023 पासून भारतात AI फिल्टर्सचे अॅप्लिकेशन सुरु होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

ट्राय फेक कॉल आणि मेसेज रोखण्यासाठी नियम बनवण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत TRAI ने 10 अंकी मोबाईल नंबरवर केले जाणारे प्रमोशनल कॉल थांबवण्याची मागणी केली आहे. याशिवाय, TRAI ने कॉलर आयडी फीचर देखील आणले आहे, जे कॉलरचे नाव आणि फोटो प्रदर्शित करेल. दूरसंचार कंपन्या Airtel आणि Jio देखील Truecaller अॅपशी बोलणी करत आहेत, परंतु ते कॉलर आयडी फीचर लागू करण्यापासून परावृत्त करत आहेत कारण यामुळे गोपनीयतेची समस्या उद्भवू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.