मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा राज्यात जोरदार सुरु सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव आघाडीवर आहे.याबाबत शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारले असता विखे पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत असं मला वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी सत्तार यांनी दिली आहे. हनुमानासारखी माझी छाती फाडून दाखवली तर त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटीलच दिसतील. विखे पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत असे मला वाटते. पण त्यांना अडचण होईल असे मी बोलणार नाही.
मला तसे प्रश्नही विचारू नका, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिलीये. ते शिवना येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राधाकृष्ण विखे पाटील आणि रावसाहेब दानवे यांची देखील उपस्थित होती. विखेंच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासू राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण आलं आहे. तसेच चार दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता.
राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीतून सूरू झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र संजय राऊत यांचा हा दावा शिंदे गटाकडून फेटाळण्यात आला आहे. दुरसीकडे नव्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमध्ये विखे पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. अजित पवारांच्या भाजप प्रवेशाची चर्चा दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना देखील मुख्यमंत्रिपद मिळू शकते असंही म्हटलं जातंय. मात्र पुढचाही मुख्यमंत्री कोण > याची जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरु आहे.