Latest Marathi News

BREAKING NEWS

४९ वेळा भोसकून प्रियकरानं केली प्रेयसीची हत्या

0

मुंबई |

चाकूनं ४९ वेळा भोसकून प्रियकरानं प्रेयसीला संपवलं. एका टी-शर्टमुळे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. सूरतच्या अमरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ नोव्हेंबरला ही घटना घडली होती.

शरीरावर चाकूचे वार झाल्याच्या खुणा होत्या. तरुणीच्या मृतदेहावर ४९ वार करण्यात आले होते. या घटनेचा तपास सूरत पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू होता. पोलिसांनी कुनीदासची अधिक माहिती मिळवण्यास सुरुवात केली. भुवनेश्वरमध्येच वास्तव्यास असलेल्या जगन्नाथ गौडा नावाच्या तरुणाशी कुनीदासचे प्रेमसंबंध होते. कुनीला त्याच्याशी लग्न करायचं होतं. तिनं अनेकदा लग्नासाठी तगादा लावला. मात्र जगन्नाथला तिच्याशी लग्न करण्यात रस नव्हता. त्यामुळे त्यानं तिची हत्या केल्याची माहिती तपासातून उघडकीस आली.

सूरत शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त शरद सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची माहिती मिळवण्यासाठी परिसरात चौकशी करण्यात आली. मात्र फारशी माहिती मिळाली नाही. बस आगार, रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यत आले. तरुणीनं परिधान केलेल्या टी-शर्टच्या आधारे तरुणीचा शोध घेण्यात आला. मृत तरुणी ओदिशाच्या भुवनेश्वरची असून तिचं नाव कुनीदास सीमादास होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.