Latest Marathi News

BREAKING NEWS

हे असं व्हायला, नको होतं ; स्वप्निल नेवाळे नाट्यनिर्मिते दीपक नलावडे यांनी केला शोक व्यक्त

0

बार्शी |

बार्शीतील एक उमदा, स्वाभिमानी, विचारी, नविन काही तरी करावं असं वाटणारा, उत्कृष्ट इव्हेंट मॅनेजमेंट करणारा, नेहमी हसतमुख असलेला तरुण. माझी आणी त्याची खरंतर फेसबुक वरील ओळख. तसंच तो बार्शीतील मूळ रहिवासी व सध्या बिड ला वास्तव्यास असलेला उत्कृष्ट फोटोग्राफर सचिन प्रताप नलावडे याचा मित्र. त्याचे माध्यमातून स्वप्निलची व माझी ओळख. आमची फेसबुकवरील पोस्ट वरुन अनेकवेळा एकमेकांचे तात्विक वाद देखिल व्हायचे आणी काहीवेळा एखाद्या मुद्द्यावर आम्ही एकत्र येऊन इतर लोकांना देखिल भिडायचो.

अशी आमची मैत्री झाली होती. स्वप्निल माझ्या मुलाच्या वयाचा पण आमची एक आगळीवेगळी मैत्री झाली होती. एकदा स्वप्निल आणी सचिन हे दोघे माझा मुलगा रोहनच्या कुर्डूवाडी रोडवर. असलेल्या “बालाजी मोटर्स वर्ल्ड” ह्या वर्कशॉपमध्ये आला होता. त्याने माझ्याशी वेगवेगळ्या विषयांवर खूप गप्पा मारल्या होत्या. त्याचे चौफेर ज्ञान, विचार करण्याची शक्ती पाहून तर मी खूपच इंप्रेस झालो होतो त्याचेवर. मला वाटलं होतं हा मुलगा स्वप्निल खूप काही मोठं कार्य करेल आणी स्वतःचं, वडिलांचं आणी आपल्या बार्शीचं नांव खूप मोठं करेल असं मनोमन वाटत होतं. पण नियतीचा अंदाज मात्र कोणालाच येत नाही आणि इथंही तसंच झालं. नियतीने, देवाने इतका गुणी, उमद्या, तरुण मुलाला अचानक असं घेऊन गेले.

हे असं व्हायला, नको होतं. स्वप्निलला साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली. स्वप्निलच्या कुटुंबिय आणी मित्रांना हे दुःख पचवण्याची भगवंत शक्ती देवो. हीच भगवंताला विनंती, प्रार्थना.

Leave A Reply

Your email address will not be published.