Latest Marathi News

BREAKING NEWS

आमदार रोहित पवारांवर शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप, वाचा संपूर्ण प्रकरण ?

0

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार असलेले रोहित पवार सध्या शेतकऱ्यांच्या रडारवर आहे विविध मागण्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या गाडीत बसून निघून गेल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवार रात्री उशिरा पुन्हा त्या गावात आले. शेतकऱ्यांना भेटले आणि त्यांची नाराजी दूर केली.

प्रकरण असे की, जामखेड तालुक्यातील खर्डा ते जुनी वाकी या रस्त्याचा प्रश्न आहे. यासाठी या भागातील ग्रामस्थ पवार यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत. रोहित पवार शुक्रवारी या भागात आल्याची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ त्यांना भेटायला निवेदन घेऊन गेले. खर्डा येथे रोहित पवार येताच शेतकऱ्यांनी त्यांचे वाहन अडविले. गाडीसमोर शेतकऱ्यांनी ठिय्या दिला.

शेतकऱ्यांना वाटले की रोहित पवार गाडीतून खाली उतरून आपले निवदेन स्वीकारतील. मात्र रोहित पवार गाडीतून उतरले आणि खाली बसलेल्या शेतकऱ्यांसमोरून चालत पुढे जाऊन दुसऱ्या गाडीत बसून पुढील दौऱ्यावर निघून गेले. काही जणांनी त्यांना हाक मारली. तरीही त्यांनी लक्ष दिले नाही.

हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मतदारसंघात एकच चर्चा सुरू झाली. यानंतर रात्री उशिरा पवार पुन्हा त्या गावातील पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी आले. रात्रीतून त्या आंदोलक शेतकऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांना प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याचेही फोटो नंतर व्हायरल झाले मात्र या व्हिडिओची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.