Latest Marathi News

BREAKING NEWS

“हरिनामाच्या नामघोषात मंत्री चंद्रकांतदादा पाटील झाले तल्लीन…!”

0

पुणे |

अख्खा महाराष्ट्र ज्यांच्या पायावर नतमस्तक होतो तो पंढरीचा पांडुरंग. या पांडुरंगाचे संपूर्ण देशभर वेगवेगळे अवतार असून मंदिरेही आहेत, एकादशीच्या निमित्ताने तसेच इतर वेळी ही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पुण्यातील कोथरूड भागातील महादेवाच्या मंदिरामध्ये भजनी मंडळाच्या वासंती चंदन उटी सोहळ्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सहभाग घेतला.

चंदनाच्या उटीने सजविलेली मूर्ती, टाळ-मृदंगाचा गजर, कपाळभर उटी लावून हरिनामाचा जयघोष करणारे वारकरी, अभंगाच्या सुरांनी झालेले मंगलमय वातावरण अन् मोगऱ्याच्या सुगंधाने दरवळून गेलेला मंदिर परिसर, हे सारे भक्तिमय वातावरण आहे, वासंतिक चंदन उटी सोहळा हा सोहळा कोथरूड मधील एरंडवणे भागातील महादेव मंदिर भजनी मंडळ आणि पश्चिम विभाग वारकरी संप्रदायाच्या वतीने हा सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात सुरू होता. या सोहळ्याचा आनंद उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील तल्लीन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.