Latest Marathi News

BREAKING NEWS

हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी

0

नवी दिल्ली |

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिल्लीतील भिकाजी कामा पॅलेस येथील कार्यालयात आज राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या चेअरमनपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भाजपचे महासचिव विनोद तावडे तसेच अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आपल्या राजकीय कारकिर्दीत हंसराज अहीर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे तब्बल 4 वेळा प्रतिनिधीत्व केले असून केंद्र सरकारच्या सामाजिक हिताशी निगडीत अनेक महत्वपूर्ण समित्यांवर आपल्या संसदीय कारकिर्दीत उल्लेखनीय कार्य केले आहे.

राजकारणाला सामाजिक जोड देत हंसराज अहिर यांनी आपल्या प्रभावी संघटनात्मक कार्याव्दारे ओबीसी, भटके विमुक्त, अल्पसंख्यक समुदायातील मोठ्या वर्गाला भाजपाशी जोडण्याचे भरीव कार्य केले आहे. त्यांनी आपल्या उज्ज्वल संसदीय कार्यातून गरीब, शोषित, कष्टकरी, शेतकरी, कामगार व अन्य घटकांच्या सामाजिक उत्थानासाठी विशेष प्रयत्न करित न्याय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. हंसराज अहीर यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.