Latest Marathi News

BREAKING NEWS

अभिमत विद्यापीठाला मिळणार शुल्क परतावा – चंद्रकांत दादा पाटील

0

मुंबई |

राज्यातील विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या अभिमत विद्यापीठातील राखीव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती दिली जाणार असून यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला जाईल असे प्रतिपादन चंद्रकांतदादा यांनी केले.

महाराष्ट्रात सध्या २१ अभिमत विद्यापीठे असून त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती जमाती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शुल्के सरकारकडून भरली जाणार आहेत, संबंधित विद्यार्थी कडून आकारले जाणारे शिक्षण लक्षात घेऊन त्यासाठी अंदाज घेतला जाईल. त्यातील ठराविक अशी शुल्क सरकार करून भरण्यासाठी तरतूद केले जाणार असल्याची माहिती ही चंद्रकांत दादा यांनी दिली.

अभिमत विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया आरक्षणाचा होत नसल्याने आतापर्यंत विविध आरक्षण अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सवलत मिळत नव्हती,मात्र उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून लवकरच यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.