बार्शी |
रत्नाकर मन्मथ स्वामी व प्रियंका स्वामी या दांपत्याच्या हस्ते २७ मार्च रोजी अन्नपूर्णा योजनेचे पूजन केले. गेल्या अनेक वर्षापासून स्वामी कुटुंबीय देव देवतांची पूजा आर्चा तसेच विविध धार्मिक विधी करण्याचे कार्य करत आहे. रत्नाकर स्वामी हे खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी व्यवसायही करतात. त्यांच्या पत्नी प्रियंका स्वामी या बार्शी शहरातील व्यापारी सहकारी बँकेमध्ये कॅशियर या पदावर कार्यरत आहेत. या दाम्पत्याचा विश्वेश्वर नावाचा मुलगा इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. सामाजिक उपक्रमामध्ये ही या दांपत्याचा सहभाग असतो.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली ७ वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात येतात, शहरातील युवा वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी व्याख्याने आयोजित केली जातात. रत्नाकर स्वामी व प्रियंका स्वामी या दांपत्याच्या हस्ते आज अन्नपूर्णा योजनेचे पूजन व वितरण करण्यात आले.