नागपूर |
चौथ्या वर्गात शिकणाऱ्या १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. महेश रामचंद्र मसराम (४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करू लागला.
त्यामुळे मुलगी दहशतीत वावरत होती. मुलीच्या नातेवाइकांनी चौकशी केली असता तिने आरोपी महेश अश्लील चाळे करून धमकी देत असल्याचे सांगितले. नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी कलम ३५४, ३५४ (क), सहकलम ८, १०, १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.