Latest Marathi News

BREAKING NEWS

सोलापुरात राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या मोदी सरकारचा प्रतिकात्मक पोस्टर प्रदर्शित

0

सोलापूर |

मोदी- अदानी यांचा भ्रष्टाचार उघड़ केल्यामुळे मोदी सरकारने सुडबुद्धिने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. याच्या निषेधार्थ व राहुलजी गांधी यांच्या समर्थनार्थ सोलापुर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्या नेतृत्वाखाली शास्त्री नगर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, लोकशाहिचा खून करणाऱ्या हुक़ूमशाही मोदी सरकारचा निषेध असो अश्या घोषणा देण्यात आल्या. तसेच लोकशाहीची हत्या करणाऱ्या मोदी सरकारचा प्रतिकात्मक पोस्टर ही प्रदर्शित करण्यात आला.

या आंदोलन बाबत माहिती देताना वाहिद बिजापुरे म्हणाले की, काँग्रेसच्या एकट्या राहुल गांधी यांनी भाजपा, व हुकूमशहा मोदी सरकारला संसदेत आणि भारत जोडो यात्रेच्या माध्यमांतुन रस्त्यावर उतरून जनतेचा आवाज त्यांचे प्रश्न मांडून घाम फोडला आहे तसेच मोदी सरकार आणि अदानी घोटाळ्याचा पर्दाफाश करत आहेत. म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून, जुने प्रकरणे उकरुन त्यांची खासदारकी घालवली आहे. मोदी सरकारचा हा संविधान विरोधी काम असून लोकशाहिचा खून केला आहे. पण जनतेच्या हितासाठी राहुल जी न डगमगता नेहमीचं संघर्ष करत राहतील मग भलेही लोकशाहीची मुस्कटदाबी करणारे हिटलर सरकार कोणत्याही थराला जाऊन काहीही कारवाई करु द्या राहुलजी देशाच्या भल्यासाठी सदैव लढत राहतील असे म्हणाले.

या आंदोलनात शहर मध्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे, युवक काँग्रेस प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, कुणाल गायकवाड, तिरुपती परकीपंडला, विवेक कन्ना, यासीन शेख, सुभाष वाघमारे, राजू आंबेवाले, रोहित मनसावाले, लक्ष्मण बाड़ीवाले, नरेश येलूर, मनोहर चकोलेकर, सुनील बोलेदोलु, सुनील सारंगी, शब्बीर फुलमामडी, इलियास डंके, इनायत नदाफ, अनवर फणिबंद यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.