कोल्हापूर |
महाराष्ट्राचे राज्यपाल व कर्नाटकचे राज्यपाल यांच्यासह सीमा भागातील अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली, त्या बैठकीनंतर चंद्रकांत दादा पाटील बोलताना म्हणाले की, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांच्या बाबतचा निर्णय न्यायालयात होईल. या बैठकीमध्ये जे मुद्दे समोर आले आहेत, त्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ”सीमावादाचा तोडगा न्यायालयात निघेल. मात्र, तोपर्यंत दोन्ही राज्यांतील सीमाभागातील नागरिकांना त्यांचे नागरी हक्क दिले पाहिजेत. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये. दोन्ही राज्याच्यांमधील कटुता दूर व्हावी. याबाबतची सकारात्मक चर्चा राज्यपालांच्या बैठकीत झाली असावी. तसेच बैठकीतील अंमलबजावणीच्या पातळीवरचे जे मुद्दे आहेत, त्याबद्दल दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होईल.