Latest Marathi News

BREAKING NEWS

शितल झेरॉक्सचे संचालक सागर क्षिरसागर दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन!

0

बार्शी |

बार्शी शहरातील शितल झेरॉक्स व टायपिंग इन्स्टिट्यूट चे संचालक सागर क्षिरसागर त्यांच्या पत्नी सौ. शिवानी क्षिरसागर यांच्या हस्ते आजच्या अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. बार्शीतील शितल झेरॉक्स हे सर्वात जुने टायपिंग इन्स्टिट्यूट आहे.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. आज दिनांक १९ नोव्हेंबर अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व क्षीरसागर दाम्पत्यांने केले.

शितल झेरॉक्स व टाईप टायपिंग इन्स्टिट्यूट हे बार्शीतील सर्वात जुने व विश्वसनीय टायपिंग इन्स्टिट्यूट आहे, क्षीरसागर यांचा अनेक सामाजिक कार्यातही सहभाग असतो. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या इन्स्टिट्यूट मध्ये सवलतीच्या दरात प्रवेशही दिला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.