शिवसेनेत उभी फुट पडल्याने शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन भाग झाले. दरम्यान शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे ठाकरे गटातील काही नेते कामानिमीत्त शिंदे यांना भेटल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण सुरू होत असते. दरम्यान काल (दि.18) अशीच एक घटना घडल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे
विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि एकच खळबळ उडाली आहे.दरम्यन नीलम गोऱ्हे हाॅटेलमध्ये गेल्यापासून त्या 30 मिनीटे असल्याने शिंदें यांच्यात आणि निलम गोऱ्हे यांच्यात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यावरून नीलम गोऱ्हे शिंदे गटासोबत जाणार का? याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र दुसरीकडे नीलम गोऱ्हे यांनी याबबत खुलासा करत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
त्यांनी माध्यमांशी चर्चा केली यावेळी त्या म्हणाल्या की, माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली हे मी मान्य करतो. मात्र ही भेट अचानक झाली आहे. यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये असे त्या स्पष्ट म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतली याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे यावर काय सांगाल असे विचारताच त्या म्हणाल्या की, मुळात तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती वेगळ्या स्वरुपात आलेली दिसते. मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले होते. ते सध्या मुंबईत आहेत. मी जेव्हा तिथे गेले तेव्हा 10 व्या मजल्यावर स्वत: मुख्यमंत्री आणि इतर लोक त्यांच्यापाशीच बसलेले होते, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.