Latest Marathi News

BREAKING NEWS

मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी नाही, ती आमच्यासाठी जन्मभूमी-कर्मभूमी

0

शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे सध्या मुंबई महापालिकेच्या काराभारावरुन तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील रस्त्यांसाठी ५ हजार कोटी रुपयांचे टेंडर काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ते टेंडर काढण्यातही आले होते. मात्र, आता ते डेंटर रिकॉल करण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. तसेच, सध्या मुंबई महापालिकेतील कामकाजावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. प्रशासन कोण चालवत आहे, येथील कामकाजाच्या कागदांवर कोणाच्या सह्या होत आहेत? असे अनेक प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले.

तसेच, मुंबई ही तुमच्यासाठी सोन्याचं अंडी देणारी कोंबडी असेल, पण आमच्यासाठी नाही, असे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकेचे बाण सोडले.मुंबई महापालिकेत सध्या ३ टी वर काम सुरू आहे. टेंडर, ट्रान्सफर आणि टाइमपास या तत्त्वावर सध्या मुंबई महापालिकेचा कारभार सुरू आहे. खोके सरकारकडून सध्या महापालिकेतील कामावर कुठलीही स्पष्टता आलेली नाही. गेल्या ३ महिन्यात मुंबईत किती इन्फास्ट्रक्चरची कामे करण्यात आली, त्याला मंजुरी कोणी दिली, त्याची प्रक्रिया कशी झाली? असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले.

नगरसेवकांच्या हक्काच्या १७०० कोटी रुपयांचीही गडबड झाल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला. मुंबईला आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केला, मुंबईला नावलौकिक मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच मुंबईचे खच्चीकरण करण्याचे काम खोके सरकारकडून केले जात आहे. मुंबई महापालिकेत सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ३ व ४ महिन्यात केल्या जात आहेत. खोके सरकारकडून केवळ टाइमपास सुरू आहे. मुंबई ही तुमच्यासाठी सोन्याचं अंडी देणारी कोंबडी असेल, पण ती आमच्यासाठी आमची कर्मभूमी आहे, आमची जन्मभूमी आहे. त्यामुळेच, आमच्या महाविकाआघाडी सरकारमध्ये मुंबईतून ५ जणांना मंत्री करण्यात आले होते. मुंबईतील विकासकामांवरही भर देण्यात आला होता, असे आदित्य यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.