Latest Marathi News

BREAKING NEWS

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात श्रमसंस्कार शिबिर संपन्न

0

बार्शी |

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्नित, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित, शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी बी एड द्वितीय वर्ष राष्ट्रीय सेवा योजना आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२२/२०२३ “युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास” या अंतर्गत शिबिर घेण्यात आले.

दिनांक १ जानेवारी २०२३ वार रविवार रोजी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुणवंत सरवदे हे उपस्थित होते व
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य एस. एस. गोरे उपस्थित होते, सहकारी प्राध्यापक पी. ए. पाटील व कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. एम. एस.डिसले व स्वयंसेवक व सेविका उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुणवंत सदावर्ते यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या, यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले प्राचार्य एस एस गोरे यांनीही बहुमोल असे मार्गदर्शन केले, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. एम. एस. डिसले यांनी आभार व्यक्त केले व विशेष श्रम संस्कार शिबिराचा शुभारंभ झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.