नमस्कार,डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनास राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असतानाच राज्याचे शालेय शिक्षण, मराठी राजभाषा मंत्री तसेच मुंबई आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाल्याने अधिवेशन संयोजन समिती आणि पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.अधिवेशनाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते हस्ते तर उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि सांसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर भिलार येथे शनिवार दि.२९ ऑक्टोबर रोजी पार पडत आहे.अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष उत्पादन शुल्क मंत्री तसेच ठाणे व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई व स्वागत कार्याध्यक्ष माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील आहेत.प्रमूख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले यांची उपस्थिती या आधीच निश्चित झाली आहे. काल रात्री सावंतवाडी मुक्कामी असलेल्या ना.दिपक केसरकर यांच्याशी संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी संपर्क साधून अधिवेशनास उपस्थित राहण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. सागर चव्हाण यांनी कॉन्फरन्स फोन कॉल द्वारे सातारा जिल्हा अध्यक्ष विकास भोसले व माझ्याशी ना केसरकर यांचे बोलणेही करुन दिले.निमंत्रण स्वीकारल्या बद्दल आम्ही त्यांचे आभार मानले.आपणास दीपावली नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! -राजा माने,अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
BREAKING NEWS
- कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
- नागपूरमध्ये विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
- कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
- अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट