Latest Marathi News

BREAKING NEWS

“कोल्हापुरात दिपावलीनिमित्त चंद्रकांतदादांनी दिल्या सदिच्छा भेटी”

0

कोल्हापूर |

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दीपावली निमित्त कोल्हापूर मधील विविध क्षेत्रातील प्रथितयशांच्या घरी सदिच्छा भेटी दिल्या. चंद्रकांत दादा पाटील हे जनमानसाचा वलय असणारी नेते म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते हेररीने भाग घेतात, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत दादांनी विविध लोकांच्या घरी जाऊन सदिच्छा भेटी दिल्या व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिल्या आहेत.

यात प्रामुख्याने सकाळ माध्यम समुहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, भाजपा शहर उपाध्यक्ष अजिंक्य चव्हाण आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाद्वा रोड व्यापारी रहिवासी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शामराव जोशी आदींच्या घरी भेट देऊन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.