Latest Marathi News

BREAKING NEWS

“वाचन संस्कृती संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम..! “चंद्रकांतदादाचे प्रतिपादन

0

पुणे |

कोथरूड मतदारसंघासाठी सुरू केलेल्या मोफत फिरते पुस्तकघर उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूडकरांशी संवाद साधला.

वाचन चळवळीच्या विकासासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्यातील सर्व ग्रंथालये ही माझ्याच अखत्यारीत येतात. त्यामुळे ग्रंथालयाच्या वाढीसाठी सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले. त्यात प्रामुख्याने ग्रंथालयांच्या अनुदान वाढीसह, गाव तिथे ग्रंथालय योजना राबविण्याचा निर्णय घेतला. असे प्रतिपादनही चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

कोथरूडमध्ये वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी गेल्यावर्षी मोफत फिरते पुस्तक घर उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला कोथरुडकरांकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञानाचाही मोठा विकास झाला आहे. त्यामुळे आगामी काळात तरुणांना या वाचनसंस्कृतीत सहभागी होता यावं, यासाठी कोथरूड मध्ये दृकश्राव्य ग्रंथालयही सुरू करण्याचा मानस यावेळी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक-समिक्षक संजय जोशी, संजय कुलकर्णी, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, नगरसेविका वासंती जाधव, नगरसेवक जयंत भावे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.