Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0

मॉलमधील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानं त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्यानं कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली होती. काय आहे नेमकं प्रकरण हे सर्व प्रकरण हरहर महादेव या चित्रपटाशी संबंधित आहे.

हरहर महादेव चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवण्यात आला असा आरोप आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर विवियाना मॉलमध्ये तरुणाला मारहाण झाली. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुणावण्यात आली आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचं त्यांनी शुक्रवारी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आरोप करणं सुरूच ठेवलं आहे. फोन करून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. चाणक्य पोलिसांना फोन करत आहे. जेवण मिळू नये यासाठी देखील प्रयत्न सुरू होते असे आरोप जितेंद्र आव्हडा यांनी केले आहे. राजकारण तापलं जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्यानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.