राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे वातावरण तापलेले असताना आता संपूर्ण आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, असे वादग्रस्त विधान भाजप नेत्यानेही केले आहे.
त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असताना आता, भाजप नेते किरीट सोमय्यानी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज देशासाठी पूजनिय, आदरणीय, हिंदू धर्माचे रक्षण करणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल संपूर्ण हिंदुस्थानाला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
आता त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असताना आता, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज देशासाठी पूजनिय, आदरणीय, हिंदू धर्माचे रक्षण करणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल संपूर्ण हिंदुस्थानाला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
तसेच पुढे सोमय्या म्हणाले, आम्ही सर्व जण प्रेरणा घेतो. प्रत्येक जण त्यांच्या कार्याचे कौतुक करतो. प्रत्येक माणूस आदराने प्रेमाने पाहतो. सगळे शिवाजी महाराजांना मानतात. कोणाची काही बोलण्यात चूक झाली असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. चूक सुधारायला हवी, गरज पडल्यास माफीही मागितली पाहिजे, असे मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले. दरम्यान, आजपासून किरीट सोमय्या हे पतसंस्थेतील भ्रष्ट्राचार बाहेर काढणार आहेत. त्याची सुरुवात राष्ट्रवादीच्या मंचर येथून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.