Latest Marathi News

BREAKING NEWS

“रुईया महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…”

0

मुंबई |

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य (मिलेट्स) वर्ष घोषित केलंय. त्यामुळे भरडधान्याचं उत्पादन, वापर आणि त्याची उपयुक्तता जगासमोर आणण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबईतील रुईया महाविद्यालयात दोन दिवसांच्या आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचं उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

मातीच्या गुणधर्मानुसार व पर्यावरणातील विविधतेनुसार मानवी शरीराला पोषक मूल्य देणारे अनेक तृणधान्य निसर्गाने देऊ केलेले आहेत. अनेक पिढ्यापासून आपण ज्वारी, बाजरी, भगर नाचणी ,राजगिरा ही त्रणधान्य खात आलो आहोत. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी याच आहारावर आपले उत्तम आरोग्य ठेवले. अलीकडच्या काही वर्षात आपला आहार शरीराला न मानणारा गहू, डाळी, तांदूळ यांचा वारेमाप वापर केल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले आहेत, आपल्या मूळ सत्वाकडे तृणधान्याच्या आहारातून पोषक सात्विककेचा संदेश देण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत असे प्रतिपादनही त्यांनी केले.

भरडधान्यांबाबत विद्यार्थ्यांमध्येही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार रुईया महाविद्यालयात आयोजित या परिषदेला मिळालेला प्रतिसाद हुरूप वाढवणारा आहे.
उद्घाटनास रुईयाच्या प्राचार्य डॉ. अनुश्री लोकूर, पद्मश्री खादर वल्ली, व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष एस. पी. मंडळी एस. के. जैन, श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष ॲड. मिहीर प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. वर्षा शुक्ला, प्रा. कामिनी दोंदे यांच्यासह विद्यार्थी मित्रही उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.