राष्ट्रीय वस्त्रोद्योग मेळाव्यातून सगळ्यांना चांगला व्यवसाय मिळावा , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली अपेक्षा
मुंबई |
७६ व्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग मेळाव्याचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी टेक्स्टाईल इंडस्ट्रीवर भाष्य केले. ते म्हणाले कि, दोन वर्षांमध्ये मी एक महत्वाचे काम केले कि, टेक्स्टाईल डिपार्टमेंट एक पॉलिसी ठरवेल, आणि सगळ्या लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हावे. त्यामुळे या क्षेत्रातील नक्की काय प्रॉब्लेम्स आहेत हे लक्षात येईल. सरकारने त्यामध्ये काय मदत करायची आहे हे देखील कळेल. यामधूनच एक चांगली टेक्स्टाईल पॉलिसी तयार झाली, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, प्रायव्हेट टेक्स्टाईल्स कंपन्यांना महत्वाची गोष्ट म्हणजे कि, आपले प्रॉडक्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवणे. यासाठी आमचा असा प्रयन्त आहे कि मुंबईत असा सेटअप तयार करण्यासाठी जागा मिळावी कि जेणेकरून तिथे मार्केटिंगसाठी लोक येत राहतील.
आज टेक्निकल टेक्स्टाईल हा शब्द प्रचलित होत आहे. टेक्निकल टेक्स्टाईल मध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहे. टेक्निकल टेक्स्टाईल मध्ये त्यांची एक मागणी आहे कि स्किल लेबरची अधिक गरज आहे. लेबर चा प्रश्न जर दूर केला तर आपण या इंडस्ट्रीला पहिल्या क्रमांकावर घेऊन जावू शकतो. चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्याला शुभेच्छा देत म्हटले कि, मेळाव्यांतून सगळ्यां चांगला व्यवसाय मिळावा अशी अपेक्षा देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.