Latest Marathi News

BREAKING NEWS

आरोग्य मंत्र्यांवर गोळ्या झाडणारा पोलीस अधिकाऱ्याची माहिती आली समोर

0

आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असताना हल्ला झाला. नाबा दास कारमधून उतरताच त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावर गोळ्या घातल्या. त्यामुळे नाबा खाली कोसळले. त्यांना एअर अँबुलन्सने भुवनेश्वर येथे नेण्यात आले. प्रचंड सुरक्षा बंदोबस्त असतानाही हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ त्यांच्यावर एकापाठोपाठ ५ राऊंड गोळीबार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे नबा दास यांच्यावर गोळीबार करणारा दुसरा कोणी नसून पोलीस अधिकारी आहे. ASI गोपाल दास त्याचे नाव आहे. तो झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथील गांधी चौक पोलिस चौकीत तैनात होतो. गोपाल दासने आपल्या रिव्हॉल्वरने नबा दास यांच्यावर गोळीबार केला.

गोपाल दास याने पुर्ण नियोजनातून हा हल्ला केला. त्याने अगदी जवळून गोळी झाडली आहे. या हल्ल्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नबा दास कारमधून खाली उतरताच गोपाल दास याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर सत्ताधारी पक्ष बीजदच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पक्षाचे अनेक कार्यकर्ते आंदोलन करत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.