Latest Marathi News

BREAKING NEWS

‘रीव्हर सायक्लोथॉन २०२२’ रॅलीच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होताना अतिशय आनंद झाला -चंद्रकांत पाटील

0

पिंपरी, पुणे |

‘इंद्रायणी स्वच्छता’ जनजागृती मोहिमे अंतर्गत आमदार तथा भाजपाचे शहर अध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘रीव्हर सायक्लोथॉन २०२२’ रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले.  भोसरी गावजत्रा मैदान येथे य रॅलीचे आयोजन करण्यात आले. 

इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी महेश लांडगे यांच्या माध्यमातून आयोजित ‘रिव्हर सायक्लोथॉन’ला चंद्रकांत पाटील यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. या सायक्लेथॉनमध्ये तब्बल २० हजार सायकलपटू सहभागी झाले होते. या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होताना अतिशय आनंद झाला, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’मध्ये सहभागी झालेल्या सर्व सायकलपटू, पर्यावरण प्रेमी आणि पिंपरी-चिंचवडकर नागरिकांचे महेश लांडगे यांनी आभार व्यक्त केले. या रॅलीत सहभागी होण्यासाठी यंदा २० हजारहून अधिक नागरिकांनी ‘रजिस्ट्रेशन’ केले होते. तसेच २५ हजारहून अधिक नागरिक सहभागी झाले. त्यामुळे पर्यावरण संदेश देणारी ही सायकल रॅली विश्व विक्रमाची नोंद व्हावी, अशीच म्हणावी लागेल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले. पिंपरी-चिंचवडकर म्हणून याचा विशेष अभिमान वाटतो. ‘‘पर्यावरणाचा जागर’’ करण्यासाठी पुढकार घेणारी पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र यांसह अनेक संस्था, संघटना आणि अप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या सहयोगाबाबत कृतज्ञता व्यक्त करतो, असे महेश लांडगे यांनी म्हटले.

मागील पाच वर्षांपासून रीव्हर थॉन रॅली आयोजित करण्यात येत असते. यावर्षी पर्यावरण रक्षणासाठी ‘रिसायकल – रिड्युस – रियुज’ हा विषय घेऊन ‘सायक्लोथॉन’ ही मोहीम राबवण्यात आली.  या रॅलीसाठी अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सायकलपटू प्रिती म्हस्के, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यासोबतच माजी महापौर नितीन काळजे, पालिका उपायुक्त अजय चारठणकर, रविकिरण घोडके, संयोजन समितीचे डॉ. निलेश लोंढे, शहर अभियंता मकरंद निकम, दिगंबर जोशी, शिवराज लांडगे, डॉ. आनंद पिसे, बापू शिंदे, सुनील बेळगावकर, डॉ. अश्विनी वानखेडे, रविकिरण केसरकर, सीमा शादबार, तृतीय पंथी प्रतिनिधी गायत्री थेरगावकर आदी उपस्थित होते.

या अभिनव उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, पर्यावरण गतविधी, होप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र, डॉक्टर्स असोसिएशन, फार्मासिस्ट असोसिएशन, वकील संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, माजी सैनिक संघटना, पतंजली योग, महाराष्ट्रातील सर्व सायकल प्रेमी संस्था, सर्व पर्यावरणप्रेमी संस्था आदींनी पाठींबा दर्शविला असून प्रत्यक्ष सहभागी झाले.  विशेष म्हणजे तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यातील एक रॅली ते लीड करत आहे. 

‘इंद्रायणी स्वच्छता’ जनजागृती मोहिम अभियान अंतर्गत महानगरपालिकेच्या सर्व शाळा व त्यातील विद्यार्थी आणि खाजगी ६० पेक्षा अधिक शाळांमध्ये शालेय स्तरावर चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली, यामध्ये १५०००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला , त्यामधून विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये मनपा स्तरावर आंतर शालेय चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, यामधील विजेत्यांना रिव्हर सायक्लोथॉन मध्ये सन्मानित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.