Latest Marathi News

BREAKING NEWS

‘रिव्हर सायक्लोथॉन’द्वारे इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती ; चंद्रकांतदादांनी केला शुभारंभ

0

पुणे |

इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेली भारतातील सर्वात मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीच्या साक्षीने यशस्वी पार पडली. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पर्यावरण प्रेमी संस्था आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, अविरत श्रमदान संस्थेचे संस्थापक सदस्य डॉ. निलेश लोंढे, भाजपा प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे आदी उपस्थित होते.

इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून आयोजित ‘रिव्हर सायक्लोथॉन’ला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. या सायक्लेथॉनमध्ये तब्बल २० हजार सायकलपटू सहभागी झाले होते. या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होताना अतिशय आनंद झाला.

यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती मोहिमेअंतर्गत आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून रिव्हर सायक्लोथॉन’ रॅलीचे आयोजन केले आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेली भारतातील सर्वांत मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ पाहून अभिमान वाटतो. भोसरीच्या गावजत्रा मैदानावर जमलेला सायकलपटूंचा हा सागर नाही, तर महासागर आहे, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपक्रमाचे कौतूक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.