पुणे |
सकाळ माध्यम समूहाच्या वतीने बजाज अलियान्स पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा पहिल्यांदाच होणाऱ्या तिसऱ्या हाफ मॅरेथॉनमध्ये हजारो पुणेकर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. चंद्रकांत दादा पाटील यांनी या स्पर्धेला झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ केला.

या मॅरेथॉन मध्ये पुण्याची पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे देखील सहभागी होते, या मॅरेथॉनचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले वैयक्तिकरित्या स्वतःच्या प्रेरणेने लोक अधिक धावतात. ‘ही संख्या मर्यादित राहते, पण असा इव्हेंट असला लोक अधिक धावतात असेही चंद्रकांत दादा म्हणाले, आपल्याला धावता आला असता तर बरं झालं असतं असे म्हणत त्यांनी पुणे हाफ मॅरेथॉन शिकवतो करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
पुणेकर लोकांसाठी अशा प्रकारच्या इव्हेंटची आवश्यकता आहे, त्यामुळे लोकही फिट राहतील. परंतु पर्यावरण नीट राहण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील प्रयत्न केले तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल असेही ते म्हणाले.