Latest Marathi News

BREAKING NEWS

“युवकांचे संघटन करणारा नेता राघवेंद्र मानकर चंद्रकांतदादांनी केले कौतुक..!”

0

पुणे |

भाजपा युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर यांचा वाढदिवस त्यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लोकांचे संघटन करणारा नेता असे म्हणत कौतुक करत मानकर यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनाच्या काळात सर्वसामान्य मदतीला धावून जी मदत केली ती अभिनंदनीय आहे असे प्रतिपादन चंद्रकांत दादांनी केले, मानकर हे गेल्या दोन वर्षापासून भाजप युवा मोर्चा पुण्याचे ते शहराध्यक्ष आहेत. 18 ते 25 वयोगटातील तरुण-तरुणी भाजप जोडण्यासाठी युवा वॉरियर हा उपक्रमही मानकर यांनी भाजपच्या मदतीने राबवला आहे. आगामी काळातही अधिकाधिक युवावर्ग भाजपची कसा जोडला जाईल यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतील असाही मानकर यांचा मानस आहे. राघवेंद्र मानकर यांच्या घरी जाऊन चंद्रकांत दादांनी सदिच्छा भेट दिली व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा ही दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.