Latest Marathi News

BREAKING NEWS

रात्रशाळांमध्ये पुन्हा दुबार शिक्षक भरती हाेणार!

0

मुंबई |

शालेय शिक्षण विभागाने ३० जून २०२२ रोजी रात्रशाळेतील शिक्षण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीबाबत काढलेल्या शासन िनर्णयावरील स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रात्रशाळांमध्ये दुबार िशक्षकांची नेमणूक हाेण्याचा मार्ग माेकळा झाला अाहे. त्याचबराेबर या शासननिर्णयानुसार रात्रशाळेची वेळ साडेतीन तासावरुन केवळ अडीच तास हाेणार आहे.

शासन निर्णयानुसार राज्यात अतिरिक्त शिक्षक उपलब्ध नाहीत याची खात्री करून रात्रशाळांमधील रिक्त जागांवर दिवसा शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना पुन्हा रात्रशाळेतही शिकविण्याची परवानगी दिली हाेती. रात्रशाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना अर्धवेळ शिक्षक म्हणून परवानगी असणार आहे. रात्रशाळेत दुबार शिक्षक नेमताना सदर शिक्षकांला नियमित शाळेत शिकविण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या शासन निर्णयाला त्यावेळी विविध शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. या विरोधानंतर या शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. तसेच अनेक संघटनांनी दिवसाच्या शाळेतील नियमित पगार घेणाऱ्या या शिक्षकांसाठी रात्रशाळेतील पगाराची देखील सोय करण्याऐवजी टीईटी पात्र बेरोजगार शिक्षकांची रात्रशाळेत नियुक्ती करण्याची मागणी करण्यात अाली हाेती. मात्र शालेय शिक्षण विभागाने ३० जूनच्या शासन निर्णयावरील बंदी उठविल्याने पुन्हा एकदा दुबार शिक्षकांची रात्रशाळांमध्ये वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुबार शिक्षक कार्यरत असताना मार्च २०१७ मध्ये रात्रशाळांचा दहावीचा निकाल ६०. ६८ टक्के इतका लागला. तर मार्च २०२२ मध्ये फक्त रात्रशाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांमुळे रात्रशाळेच्या दहावीच्या निकालात तब्बल २० टक्क्यांची वाढ होऊन ८०. ०८ टक्के निकाल लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.