मुंबई | एका प्रसिद्ध माध्यमाला दिलेल्या मुलाखतीती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत चांगलीच गाजली . राज यांची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नावरही उत्तरं दिली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सल्ल्याची गरज नाही ते स्वयंभू नेते आहेत, असा टोला राज यांनी लगावला होता. या टीकेला आज खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले, आम्ही स्वयंभूच आहोत. जे स्वयंभू देव असतात त्यांच्या मागेच जनता जाते. जे शिंदुर फासतात त्यांच्यामागे जनता जात नाही. याच्यामुळे जर कोणाची पोटदुखी होत असेल तर सांगा आमच्यातकडे औषध आहे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला. “विरोधी पक्ष कधी सुट्टीवर जात नाही पण मुख्यमंत्री सुट्टीवर जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांनी लगावला. मी आज जम्मूचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेणार आहे, असंही राऊत म्हणाले.
“आम्हाला मतदान करा नाहीतर दंगली होती अशा प्रकारच्या धमक्या देणे देशाच्या गृहमंत्र्यांना सोबत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर केला. तुमच राजकारण दंगली, हत्या, बॉम्बस्फोटाच आहे त्यामुळे देशातील जनतेला डोळसपण पाऊले टाकावी लागणार आहेत, असंही राऊत म्हणाले. आता या टीकेला मनसे काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.