Latest Marathi News

BREAKING NEWS

रतन टाटा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !

0

नवी दिल्ली |

जगप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ फॅरेल यांनी शनिवारी ट्विटरवर ही माहिती दिली.

रतन टाटा हे केवळ हिंदुस्थानातील दिग्गज उद्योगपती नाहीत, तर त्यांच्या योगदानाचा ऑस्ट्रेलियावरही मोठा प्रभाव पडणार आहे, असेही त्यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे. रतन टाटा यांचे ऑस्ट्रेलिया-भारत द्विपक्षीय संबंध, विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील त्यांच्या सेवांसाठी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हिजनमध्ये मानद अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

https://twitter.com/AusHCIndia/status/1649695486679584770?t=idBGKvm6VsKRjX3F2-QFaA&s=19

ऑस्ट्रेलियन राजदूत बॅरी ओ’ फॅरेल यांनी शनिवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले की, रतन टाटा हे केवळ हिंदुस्थानातील दिग्गज उद्योगपती नाहीत, तर त्यांच्या योगदानाचा ऑस्ट्रेलियावरही मोठा प्रभाव पडणार आहे. त्यांनी लिहिले, ‘ऑस्ट्रेलिया-हिंदुस्थान संबंधांबद्दलच्या त्यांच्या दीर्घकालीन बांधिलकीबद्दल रतन टाटा यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया सन्मान प्रदान करताना आनंद होत आहे.’ टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन हेदेखील रतन टाटा यांच्यासोबत हिंदुस्थानातील ऑस्ट्रेलियन राजदूताने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.