केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करा – आमदार रणजितसिंह मोहिते पाटील
पंढरपूर |
भारतीय जनता पार्टीद्वारा आयोजित ‘बूथ सशक्तीकरण अभियान प्रशिक्षण वर्ग’ पंढरपूर येथे संपन्न झाले. “वैश्विक स्थरावर भारताचा मान वाढला आहे. तद्वतच देशांतर्गत विकासाचा वेग सुद्धा झपाट्याने वाढत आहे. एक ना अनेक जन कल्याणाच्या योजना जन सामान्या पर्यंत पोहचविण्याचा संकल्प करा! हिच खरी देशसेवा होय!” असे आवाहन लोकप्रिय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बूथ सशक्तीकरण अभियान प्रशिक्षण शिबीरात कार्यकर्त्यांना केले.

पंढरपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या बूथ सशक्तीकरण अभियानाची आढावा बैठक घेतली. तसेच तालुक्यात पक्ष संघटना विस्तारासाठी बूथ सशक्तीकरण अभियान अधिक जोमाने राबविण्यासाठी विस्तारकांना सुचना दिल्या. यावेळी मकरंद देशपांडे, शशिकांत चव्हाण, प्रणव परिचारक, तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे, खिस्ते काका,महिला शहराध्यक्ष बेणारे, माऊली हळवणकर, चांगदेव कांबळे, अक्षय शिरसाठ,यांचेसह शक्तीकेंद्र प्रमुख,विस्तारक,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.