बार्शी |
बार्शीतील डॉ जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये एका ४५ वर्षीय रुग्णासाठी हृदयरोग तज्ञ डॉ. डॉ आदित्य साखरे यांच्यामुळे बंद पडलेले हृदय झाले.
परवा रात्रीची केस एक ४५ वर्षांचे गृहस्थ छातीत तीव्र दुखतय म्हणून जगदाळे मामा हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागात आले. ते पुर्ण अस्वस्थ आणि खूप इर्रिटेबल होते. त्यांचा ECG काढेपर्यन्त त्यांचे हृदय बंद पडले होते, मग लगेच इमर्जन्सी मधील डॉक्टरांनी कार्डियाक मसाज CPR चालु केला आणि त्यांना कृत्रिम मशीन म्हणजेच व्हेंटिलेटर वर टाकले.
त्यानंतर त्यांना 2-3 वेळा शॉक देखील दिला. त्यानंतर लगेच त्या पेशंटला कॅथलॅब मध्ये शिफ्ट केले आणि त्यांची अँजिओग्राफी केल्यावर त्यामध्ये हृदयाच्या मेन रक्तवाहिनी मध्ये १००% ब्लॉक होता, परत पेशंटचे हृदय बंद पडले लगेच ओटी टेबलवरच कार्डियाक मसाज CPR चालू केला, तसेच पेशंटला २-३ वेळा शॉक देखील द्यावा लागला व मसाज चालू असतानाच तो ब्लॉक १ स्प्रिंग स्टेंट टाकून क्लीअर केला. ब्लॉक क्लीअर करताच हृदय एकदम व्यवस्तित पंप करू लागले. दुसऱ्या दिवशी कृत्रिम मशिन म्हणजेच व्हेंटिलेटर देखील काढले, आता पेशन्ट एकदम व्यवस्तित होऊन घरी जाण्याच्या तयारीत आहे.
जगदाळे मामा हॉस्पिटलच्या इमर्जन्सी टिमचे खुप धन्यवाद, कारण हार्ट अटॅक पेशंटच्या गोल्डन पिरेडमध्ये खुप छान ट्रीटमेंट दिली आणि त्यांच्यामुळेच आज पेशंट आपल्यामध्ये आहे.
बार्शी मध्ये तात्काळ अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी उपल्बध असल्यामुळेच या गृहस्थाचे जीव वाचले, असे म्हणायला काहीच हरकत नाही.