मुंबई |
बार्शीचे चित्रकार उदय मोहिते व इतर कलाकारांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. उदय मोहिते यांनी काढलेले डिजिटल पोट्रेट ठाकरे यांना भेट देण्यात आले. यावेळी बोलताना उदय मोहिते म्हणाले की, जे.जे कलानगर बांद्रा हॉस्टेल मध्ये असताना आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा बंगला आम्हाला बाहेरून सुद्धा कधी बघायला मिळाला नाही कारण तिथे २४ तास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असायचा. विचार करायचो कसं असेल मातोश्री आतमधून? खूप उत्सुकता असायची पण कधी आतमध्ये जायचा योग्य नाही आला.

पण, काल दिनांक १७/११/२०२२ रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची १० वी पुण्यतिथी. हेच औचित्य साधून कार्टून्स कट्टा आयोजित फटकारे चित्र व अर्कचित्रांचे प्रदर्शन शिवाजी पार्क दादर इथे भरविण्यात आले होते. मा. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते प्रदर्शन पार पडले. खरंतर त्यांना काल जवळून भेटायची संधी होती, पण मीडिया पत्रकारांनी त्यांच्या भोवती एवढा गराडा घातला कि नीट भेटताच आलं नाही, परंतु काल स्वःता उद्धव ठाकरे यांनी आम्हा कलाकारांना घन:श्याम देशमुख, प्रभाकर वाईरकर, गौरव सर्जेराव निखिल पोलजी, चिन्मय जाधव, उदय मोहिते सर्वांना मातोश्री वर भेटायला बोलवले.
आमचा आनंद गगनात मावेना लगोलग आम्ही मातोश्री वर पोहचलो. प्रथम एखाद्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष देवाचं दर्शन व्हावं तसंच आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सिहासनाच दर्शन झालं. तिथेच आम्ही धन्य झालो. चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हला निरोप आला उद्धव साहेबांनी आत बोलावलंय. जवळ जवळ दीड तास आमच्या चर्चा रंगल्या. त्यांनी त्यांच्या “Premium Collection” मधलं ‘फटकारे’ हे पुस्तक आम्हला देऊ केलं, आम्ही भारावून गेलो.

उदय मोहिते केलेलं डिजिटल पोर्ट्रेट त्यांना भेट म्हणून दिलं त्यांना ते खूप आवडलं. त्यांनी सुद्धा डिजिटल पोर्ट्रेट बद्दल माहिती जाणून घेतली. खूप मस्त वाटलं कला आणि कलाकार या विषयावर आम्ही गप्पा मारत होतो कोणीतरी आपल्या घरातील मोठा माणूस आपल्याशी एवढं आपुलकीने बोलतंय असं वाटत होतं इतका साधा सरळ आणि तेवढाच निर्मळ मनाचा राजा माणूस.
“असा मुख्यमंत्री परत होणे नाही”