Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी! लटकेंना मंत्रिपदाची ऑफर? ठाकरे गटाचा मोठा गौप्यस्फोट

0

मुंबई |

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या अंधेरी निवडणुकीसाठीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा अजून महापालिका प्रशासनाने मंजूर केलेला नाही. त्यावरुन अनिल परब आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद
घेत अनेक गौप्यस्फोट केलेत.

अंधेरीतील उमेदवार ऋतुजा लटके यांनी शिंदे गटात यावे यासाठी त्यांचा नोकरीचा राजीनामा मंजूर न करण्याचे दबावतंत्र सुरू आहे. पालिकेवर, आयुक्तांवर दबाव आहे, असा धक्कादायक आरोप अनिल परब यांनी केला आहे. तसेच, लटके यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा, तुमचा नोकरीचा राजीनामा लगेच मंजूर होईल, असे शिंदे गटाकडून लटके यांना सांगण्यात आल्याची माहिती आहे. एवढे नव्हे तर शिंदे गटात प्रवेश केल्यास ऋतुजा लटके यांना मंत्रिपदाची ऑफरही असल्याची माहिती आमच्याकडे असल्याचा दावा शिवसेना नेते अनिल परब यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.