Latest Marathi News

BREAKING NEWS

“तासिका तत्वावरील प्राध्यापकांना चंद्रकांत पाटील यांचा दिलासा…!”

0

मुंबई |

राज्यात तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यासंबंधी लवकरच सकारात्मक निर्णय शासन येणार माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील विविध शैक्षणिक संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आढावा बैठक पार पडली, तासिका तत्वावरील प्राध्यापकांना मानधन वाढ प्राध्यापकांचे थकीत मानधन तत्काळ द्यावे अशा सूचनाही चंद्रकांत दादा पाटील यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

यावेळी आमदार रणजीत पाटील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.