मुंबई |
बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला महिला अंमलदारने धमकी व शिवीगाळ केली. याप्रकरणी महिला अंमलदारावर अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु महिला अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याने अधिकारी महिलेला पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचं प्रश्न उपस्थित होत आहे.
मिरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात तक्रारदार प्रेम सागर वाघ यांनी ही तक्रार केली आहे. वाघ यांच्या तक्रारीवरुन काश्मिरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला अंमलदारावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.