Latest Marathi News

BREAKING NEWS

महापुरुषांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. भाजपा नेत्यांनी अवमानकारक बोलणे न थांबविल्यास रस्त्यावरुन फिरू देणार नाही – चेतन नरोटे

0

सोलापूर |

सातत्याने महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांवर कड़क कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन ताबड़तोब हटविण्यात यावे या मागणीसाठी सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी करत भाजपा नेत्यांचा निषेध केला यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणुन गेला.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री मंगलप्रसाद लोढा, आमदार प्रसाद लाड या सारखे भाजपा नेते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व इतर महापुरुषांबद्दल, महिलांबद्दल सतत अवमानकारक, वादग्रस्त बेताल वक्तव्ये करत आहेत. भाजपा नेत्यांकडून महापुरुषांच्या अपमानाची मालिकाच चालू आहे. परवा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद मधील पैठण संतपीठ येथे कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांनी शाळा सुरु करण्याकरिता लोकांकडे भीक मागीतली असे वक्तव्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या. जनतेत मोट्ठा असंतोष पसरला आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी पावन झालेल्या महाराष्ट्रात असे दळभद्री भाजपा नेते सतत महापुरुषांचा अपमान करत आहेत याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो. बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी या थोर महापुरुषांनी आपल्याकडे जे होते ते सर्व दिले. लोकांकडून वर्गणी, देणगीच्या स्वरुपात पैसे जमा केले व शाळा उघडल्या. बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी या महापुरुषांचा त्याग आणि कष्ट यांची तुलना अशक्यच आहे. वर्णव्यवस्थेच्या जोखडात अडकलेल्या समाजाला, स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देत शिक्षणाची दारे खुली करून दिली. ह्या महान कार्यासाठी त्यांनी ‘भीक’ मागितली असे म्हणून चंद्रकात पाटील यांनी महापुरुषांचाच नाही तर बहुजन समाजाचाही अपमान केला आहे. सातत्याने थोर महापुरुषांचा अवमानकारक वक्तव्ये करुन अपमान करणाऱ्या भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कड़क कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच याप्रकरणी चूकीची कारवाई करत अकरा पोलिसांना निलंबित करण्यात आले, तीन कार्यकर्त्यांसह एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आली ही कारवाई ताबड़तोब मागे घ्यावी.

पुढे बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले इतर महापुरुषांबद्दल सातत्याने वादग्रस्त व्यक्तव्ये करून अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन ताबड़तोब हटविण्यात यावे. भाजपा नेत्यांनी महापुरुषांचा अपमान करणे न थांबविल्यास रस्त्यावरुन फिरू देणार नाही. अवमानकारक, वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर ताबड़तोब कड़क कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चेतन नरोटे यांनी दिला.

यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नगरसेवक प्रवीण निकाळजे, हाजी तौफीक हत्तुरे, विनोद भोसले, नरसिंग कोळी, नरसिंह आसादे, किसन मेकाले, गणेश डोंगरे, अंबादास गुत्तिकोंडा, सुनील रसाळे, उमेश सूरते, N K क्षीरसागर, अरुण साठे, लक्ष्मीकांत साका, अँड केशव इंगळे, नागनाथ कदम, भीमाशंकर टेकाळे, राजन परदेशी, तिरुपती परकीपंडला, मधुकर आठवले, हसीब नदाफ, उपेंद्र ठाकर, अनिल मस्के, अप्पासाहेब बगले, रामसिंग आंबेवाले, राहुल वर्धा, सोहेल शेख, चक्रपाणी गज्जम, विवेक कन्ना, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोबे, दीनानाथ शेळके, राजेन्द्र शिरकुल, दाऊद नदाफ, हारून शेख, संघमित्रा चौधरी, VD गायकवाड, सलीम मनुरे, अंजलीताई मंगोडेकर, जयप्रकाश पल्ली, मुन्ना वळसंगकर, आषुतोष वाले, श्रीकांत दासरी, प्रतीक शिंगे, चंदा काळे, सुभाष वाघमारे, रुकैय्याबानु बिराजदार, सायमन गट्टू, वसिष्ठ सोनकांबळे, दत्तात्रय नामकर, चंद्रकांत टिक्के, नागनाथ शावने, नरसप्पा चिंकाराम यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.